Samsung Galaxy M15 5G हा कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G फोन्सपैकी एक आहे. यातील 6000mAh ची दणकट बॅटरी ही याची सर्वात मोठी खासियत म्हणता येईल. आता हा शानदार फोन मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. कंपनीनं या महिन्याच्या अखेर पर्यंत सेलआउट स्कीमची घोषणा केली आहे, जी फक्त Samsung GT डीलर्सकडे उपलब्ध आहे. या स्कीम अंतर्गत मर्यादित कालावधीसाठी या फोनवर 1500 रुपयांची सूट मिळत आहे.
Galaxy M15 5G डिस्काउंट ऑफर
Galaxy M15 5G च्या तीन व्हेरिएंट्सवर 1500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या फोनचा 4GB RAM व 128GB स्टोरेज मॉडेल 10,999 रुपयांच्या ऐवजी 9,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर 6GB RAM व 128GB स्टोरेज मॉडेल 11,999 रुपयांच्या ऐवजी 10,499 रुपयांना मिळेल. तर 8GB RAM व 128GB स्टोरेज असलेला टॉप मॉडेल 13,499 रुपयांच्या ऐवजी 11,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
Samsung Galaxy M15 5G स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy M15 Prime 5G मध्ये 6.5-इंचाचा Full HD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यात ARM Mali-G57 GPU मिळतो. डिवाइस Android 14 आधारित One UI Core 6 वर चालतो. Samsung या फोनसाठी 2 वर्ष OS अपडेट आणि 4 वर्ष सिक्योरिटी अपडेट्स देणार आहे.
फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP च डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. तर फ्रंटला 13MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Galaxy M15 Prime 5G मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी दीर्घकाळासाठी डिजाइन करण्यात आली आहे. हा फोन 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
सिक्योरिटीसाठी यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फीचर देखील आहे. फोनमध्ये ड्युअल सिम 5G सपोर्ट, Wi-Fi 5, Bluetooth 5.3, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक आहे. त्याचबरोबर डॉल्बी अॅटमॉस ऑडियो आणि Knox सिक्योरिटी सारखे प्रीमियम फीचर्स देखील मिळतात.
टिप्पणी पोस्ट करा